Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1 हजार 836 डॉलर प्रतिऔंस पातळीवर खाली आला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आजदेखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज एमसीएक्सवर सोने 0.18 टक्के घसरण होऊन 10 ग्रॅमसाठी 56,827 रुपये इतका आहे. त्या व्यतिरिक्त चांदीच्या भावात 0.52 टक्के घसरण होऊन 67,042 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सोन्याचा भाव 1815 डॉलर प्रतिऔंसपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या 7 महिन्यांतील हा निचांकी स्तर आहे. कॉमेक्सवर चांदीची किंमत 21.19 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किंमतीत आणखी घट होऊ शकते. येणाऱ्या काळात सोने आणखी स्वस्त होऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीत 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव 52,750 रुपये इतका आहे. त्याचबरोबर मुंबईत 52,590 रुपये, गुरुग्राममध्ये 52,750 रुपये, कोलकातामध्ये 52,590 रुपये, लखनऊमध्ये 52,750 रुपये आणि जयपुरमध्ये 52,750 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठीचा भाव आहे.
सोन्याचा भाव तुम्ही आता घरबसल्याही पाहू शकणार आहात. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स एसोसिएशनुसार तुम्ही 8955664433 या नंबरवर मिस कॉल देऊनही सोन्याचा आजचा भाव जाणून घेऊ शकता. या नंबरवरुन मेसेज करताच तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल.
दरम्यान, देशात नवरात्रौत्सव सुरू होण्यापूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या 15 दिवसांत कोणतेही शुभ काम केले जात नाही. सराफा बाजाराकडेही पाठ फिरवली जाते. नवरात्रीत मागणी वाढली की पुन्हा सोन्याला झळाळी मिळेल, असं सराफा व्यापाऱ्यांकडून माहिती मिळतेय. नवरात्रीत व दिवाळीत सोने पुन्हा उचल खाईल का, हे पाहण महत्त्वाचं ठरतंय.