Gold-Silver Rate : सोने - चांदीचा आजचा भाव काय आहे, ते जाणून घ्या

Gold Rate Today :​  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उत्तार पाहायला मिळत आहे.  

Updated: Jan 20, 2022, 03:44 PM IST
Gold-Silver Rate : सोने - चांदीचा आजचा भाव काय आहे, ते जाणून घ्या title=

मुंबई : Gold Rate Today : कोरोना काळात सोने खरेदीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने दरात घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उत्तार पाहायला मिळत आहे. आज सोने दरात थोडीसी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात. (Gold and Silver Rates Rise)

आंतरराष्ट्रीय बाजारात धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे  10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47160 रुपये पाहायला मिळाली आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47090 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच ​​बंद झाली. Good Returns website नुसार चांदीचा 63200 रुपये प्रति किलो भाव आहे. 

आजचा भाव काय आहे ?

Good Returns website नुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47160 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत  24 कॅरेट सोन्याची किंमत 49160 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46400 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48920 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47160  तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49160 रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 632 रुपये आहे.

जानेवारीच्या अखेरीस भारतात सोन्याचे दर आता तेजीत दिसत आहेत. गेल्या एका आठवड्यापासून, देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर किरकोळ वधारत आहेत. आज, 20 जानेवारी 2022 रोजी सोने दरात भारतीय बाजारपेठेत 430/10 ग्रॅम. 22 कॅरेट सोने भाव रु. 47,590/10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचे दर रु. 49,590/10 ग्रॅम. असा आहे. चेन्नईत सोनेचे दर 380 रुपये, तर हैदराबाद, बंगळुरु आणि केरळमध्ये सोने दर आज 10 ग्रॅममागे 500 रुपयांनी वधारला आहे.