Gold Silver Price Today : भारतीय लोकांना सोने चांदीचे (Gold-Silver) प्रचंड आकर्षण आहे. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या (Gold Silver Price) दर रोजच्या रोज बदलत असतात. सराफ बाजारातही सोन्या चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात.
होळीच्या (Holi 2023) पार्श्वभूमीवर जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आजची ही सुवर्णसंधी वाया घालवू नका. दरम्यान इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीच कालच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोन्याचे (Gold Price) दर 51,950 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज अंदाजे 56550 रूपये प्रति तोळाने विकले जात आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर स्थिर असून आज 66900 रुपये प्रतिक किलोने विकले जात आहे.
वाचा : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
आज सोन्याचे भाव स्थिर असल्याचे रांचीतील सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या पद्धतीने सराफाला मागणी वाढत चालली आहे त्यानुसार येत्या काळात सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.