Gold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price on 31st May 2023: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आजही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरणार पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 31, 2023, 11:06 AM IST
Gold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर title=
gold silver price today 31 may 2023

Gold Silver Rate on 31 May 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमती (Gold Silver Price) सातत्याने चढ-उतार सुरु आहे. आज सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले असून खरेदीदारांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आजही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज मे महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे 2023 रोजी, सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती (Gold Silver Price) कमी झाल्या आहेत. दरम्यान सोन्याचा प्रति तोळा दर 60 हजार रुपयांच्या खाली आला तर चांदीही स्वस्त झाली आहे.

तर गुड्स रिटर्सनच्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 59,930 रुपये आहे तर चांदी 71,150 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 70,740 रुपये प्रति किलो होता. तर सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 54,936 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम 54,936 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,930 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,936 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,930 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,936 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,930 रुपये आहे. 

एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या दर

जर तुम्ही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला एका मिस्ड कॉलरद्वारे लेटेस्ट दर कळू शकतात. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. तसेच किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com किंवा इतर ठिकाणांहून माहिती घेऊ शकता.

BIS केअर अॅप

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास, तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हे BIS अॅप मिळवू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित केला जातो. हा नंबर टाईप केल्यावर, हॉलमार्किंगचा संपूर्ण तपशील दिसेल आणि शेवटी, किती कॅरेट सोने आहे.

देशात सोने स्वस्त होणार का?

CEP नुसार, भारत 2023-24 मध्ये UAE मधून खूप अनुदानित शुल्क भरून 140 दशलक्ष टन सोने आयात करणार आहे. प्रभावी सीमाशुल्क किंवा मोस्ट फेव्हर्ड नेशन दरानुसार आयातीवर फक्त 1 टक्के सूट दिली जाईल. त्यासाठी सध्या 15 टक्के शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे देशात सोने स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.