Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी

Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. 

Updated: Sep 28, 2022, 02:01 PM IST
Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी title=
gold silver price of 28th september dussehra 2022 and Any other time is good for buying gold Do not buy gold on this day nm

Gold Price Today: महिलांना सोन्याचे दागिनी घ्यायला खूप आवडतात. गेल्या काही वर्षांपासून सोन्याचे भाव गगणाला भिडतात आहे. तरीही सोने खरेदी कमी झाली नाही. लग्न समारंभासाठी सोने खरेदी करण्यात येते. हिंदू धर्मात, प्रत्येक काम आणि कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी शुभ काळ पाहून केले जातात. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य आणि शुभ मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू नेहमी यशस्वी आणि फलदायी असं, अशी मान्यता आहे. (gold silver price of 28th september dussehra 2022 and Any other time is good for buying gold Do not buy gold on this day nm)

दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. सराफा आणि मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेल्या अस्थिरतेनंतर सोन्याचा भाव विक्रमी नीचांकी पातळीवर आहे. यासह चांदीची घसरणही सुरूच आहे. मात्र, नवरात्रीच्या काळात सोन्यात किंचित वाढ होते. बुधवारी सकाळी (wednesday), मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली आणि सोने आणि चांदी लाल चिन्हांसह व्यवहार करत आहेत. 

सोन्याच्या फ्युचर्सच्या दरात सातत्याने घसरण

बुधवारी, मल्टी-कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या फ्युचर्सचे दर सातत्याने घसरत आहेत. डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 69 रुपयांनी घसरून 49381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. यापूर्वी मंगळवारी तो 49450 रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 641 रुपयांच्या घसरणीसह 54738 रुपये प्रति किलोवर आहे. मंगळवारी तो 55379 वर बंद झाला.

इतर कुठले मुहूर्त सोने खरेदीसाठी चांगले (Any other time is good for buying gold)

तुम्हा आम्हाला माहिती आहे की, अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) आणि धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2022) ही सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानले जातात. पण याशिवाय आपण जर इतर वेळी सोने खरेदी करण्यास जाणार असाल तर गुरुवारी (thursday) आणि रविवारी (sunday) सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. 

या दिवशी सोने खरेदी करु नका! (Do not buy gold on this day)

ज्योतिषीशास्त्रानुसार शनिवारी (saturday) सोने खरेदी करु नये. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सोने हा सूर्याचा कारक आहे. शिवाय शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनि यांच्यात खूप वैर आहे. शनिवारी सोने खरेदी केल्याने व्यक्तीचे खूप नुकसान होते.