Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. तर, चांदीलाही झळाळी आली आहे. चांदी लाखांच्यावर पोहोचली आहे तर सोन्यानेही 80 हजारांचा आकडा गाठला आहे. सोन्या-चांदीच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. दिवाळीसाठी एक आठवडाच शिल्लक राहिला असताना सोन्याच्या दराने घेतलेली उसळी ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाहूयात आज सराफा बाजारात काय स्थिती
चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याचे कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढली आहे. तसंच, हल्ली चांदीचे दागिने आणि वस्तू भेट म्हणून देण्याचा ट्रेंड आहे. चांदीच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. 1,500 रुपयांची उसळी घेत चांदी 1.01 लाख प्रति किलोवर पोहोचली आहे. तसंच, सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. सण आणि लग्नसमारंभ यामुळं दागिन्यांची मागणी वाढली आहे. स्थानिक विक्रेत्यांची विक्रीतही वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोन्याचे दर 80,070 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली त्यामुळं प्रतितोळा सोनं 73,400 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोनं 330 रुपयांनी महागलं असून प्रतितोळा 60,060 रुपयांवर पोहोचले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 80,070 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 60,060 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,340 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8, 007 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 006 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,720 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 80,070 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,060 रुपये
22 कॅरेट- 73,400 रुपये
24 कॅरेट- 80,070 रुपये
18 कॅरेट- 60,060 रुपये