दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

Gold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 25, 2024, 12:02 PM IST
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या  title=
Gold Silver price fall gold down 1000 rs silver at 81600 rs check latest rates in mumbai

Gold Price Today In Marathi: सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर सोन्याच्या किंमती कोसळल्या आहेत. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तर, आज गुरुवारीदेखील तब्बल 1 हजारांची घट झाली आहे. भारतीय वायदे बाजारात (MCX) वर सोनं 1000 रुपये तर चांदी 3200 रुपयांनी कमी झाली आहे. सराफा बाजारात सोनं गेल्या दोन दिवसांत 4 हजारांहून अधिक स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरात होत असलेली घट पाहून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. 

MCX वर आज सकाळी सोनं 1040 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 69,820 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर, 22 कॅरेट प्रतितोळा सोनं आज 950 रुपयांनी घसरलं असून 64,000 हजारांवर स्थिरावले आहे. यावेळी चांदीदेखील 3,246 रुपयांनी घसरून 81,648 रुपये प्रतीकिलोवर स्थिरावली आहे. सोन्यावरील सीमा शुल्क कमी करण्यात आल्याने सोन्याचे भाव घसरले आहे. त्यामुळं नागरिकांना दागिने खरेदी करण्याची हीच संधी आहे. 

असा आहे सोन्याचे दर

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   55, 856 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   64, 000 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   52, 370 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 400 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   6, 982 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 237  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   51, 200 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   55, 856  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52, 370  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  55, 856 रुपये
24 कॅरेट-  64, 000 रुपये
18 कॅरेट-  52, 370 रुपये

कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर सोनं किती स्वस्त होणार?

सोन, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातुंच्या कस्टम ड्युटीत 9 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. म्हणजेच आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आली आहे. सोनं प्रतिकिलो 5 लाख 90 हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर, चांदी प्रतिकिलो 7,600 रुपयांनी स्वस्त होणार, प्लॅटिनमवर 1900 ते 2000 रुपयांची घट होणार आहे.