Gold Rate : सोन्याचा भाव इतक्या रुपयांनी घसरला तर चांदीचा भाव वाढला

सोन्याच्या दरात आज घट झाली असली तरी चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Updated: Jun 10, 2021, 06:45 PM IST
Gold Rate : सोन्याचा भाव इतक्या रुपयांनी घसरला तर चांदीचा भाव वाढला title=

मुंबई : गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात बदल पाहायला मिळाला. आज सोन्याच्या दरात (Gold Rate) घट झाली तर चांदीच्या भाव (Silver Rate) वाढला. 99.9 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या दरात (Gold)  138 रुपयांनी घट झाली. सोन्याचा भाव 48,843 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात 354 रुपयांनी वाढ झाली आहे. 99.9 टक्के शुद्ध चांदीचा दर (Silver) 71173 रुपये झाला आहे. 

मंगळवारी सोनं आणि चांदी महागले होते. मंगळवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 225 रुपयांनी तर चांदी 581 रुपयांनी वाढला होता.

8 जूनला 24 कॅरेट सोनं 49031 रुपये प्रति 10 होतं. तर चांदी 71331 रुपये प्रति किलो होती.

मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,882.50 डॉलर प्रति औंस तर चांदी 27.67 डॉलर प्रति औंस होती.

दागिने खरेदी करताना वेगळा असतो दर

दागिने खरेदी करताना त्याची किंमत ही सोन्याच्या भावानुसार ठरत नाही. यामध्ये अनेक गोष्टी जोडल्या जातात. दागिने बनवताना वापरण्यात येणारं सोनं किती टक्के शुद्ध आहे यावर मोठा फरक पडतो. कारण सोनं हे 24 कॅरेट नाही तर 22 कॅरेट पेक्षा कमी शुद्धतेच्या सोन्यापासून बनवले जातात. पण तरी सोन्याच्या दागिन्यांता भाव वाढतो. कारण यामध्ये मेकिंग चार्ज लावले जातात. सोबतच 3 टक्के जीएसटी देखील लागतो.