1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!

Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2024, 11:57 AM IST
1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या! title=
Gold Rate Today 7th Jun 2024 price of gold and silver rise in maharashtra check latest rates

Gold Rate Today 7th Jun: जून महिन्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून सोनं पुन्हा महागले आहे. शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्यानं उसळी घेतल्याचे समोर आले आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. तर,  10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 67,600 रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या सोबतच सराफा बाजारात चांदीदेखील महागली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

शुक्रवारी चांदी 1800 रुपये प्रति किलोने वाढून 93500 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. तर 6 जून रोजी चांदी 91,700 रुपये इतकी होती. आंतराराष्ट्राय घडामोडीचे पडसादामुळं सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सारखीच राहणार असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, जून महिन्यात लग्नसराई कमी सराईचे दिवसही कमी असल्याने भारतात सोन्याच्या दागिन्यांची खरेदीही थंडावली आहे. बाजारातील ट्रेडनुसार यापुढेही किंमतींमध्ये चढ-उतार कायम राहतील, असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

7 जून रोजी सराफा बाजारात 18 ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बाजार उघडताच 18 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांना वाढून प्रति 10 ग्रॅम 55 हजार 310 रुपये इतका झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 67,600 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 330 रुपयांनी वाढून73,750 इतका झाला आहे. 

Gold Rate 6 June: सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73,750 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 310रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,760 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,342 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,531  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59,000 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,248  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67, 600 रुपये
24 कॅरेट-  73, 750  रुपये
18 कॅरेट- 55, 310 रुपये