नवी दिल्ली : सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,८२० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने वर्षभरातील उच्चांक गाठला आहे.
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात ५९० रुपयांनी घट होत ३९,३८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
जगभरातील प्रमुख मुद्रांच्या तुलनेत डॉलरच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. परदेशात सोनं १३५८.५५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीमुळे दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. लग्नसराईचा काळ सुरु असुन सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.