सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Updated: May 15, 2018, 07:37 PM IST
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं title=
Representative Image

नवी दिल्ली : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सोनं महागलं

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात १६५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३२,४५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

चांदी झाली स्वस्त 

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरात मात्र, घट झाल्याचं पहायला मिळालं. चांदीचा दर ४१,००० रुपयांपेक्षा कमी झाला आहे.

व्यापारी आणि शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात ४०० रुपयांनी घट होत ४०,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.१९ टक्क्यांनी घसरण होत ते १,३१०.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर चांदीच्या दरातही घसरण होत १६.४१ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं १६५ रुपयांनी महागलं. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३२,४५० रुपये आणि ३२,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.