मुंबई : Gold Silver Update: सोन्या-चांदीच्या दरातील घसरण अजूनही सुरूच असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 48 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव 51485 रुपये प्रति तोळेवर आले आहे.
चांदीच्या दरात आज 5 रुपयांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. सध्या चांदी 66300 वर व्यवहार करत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. त्यानुसार एका महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून सोने 4,115 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
यासोबच जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतींमध्ये घसरण दिसून आहे. सराफा बाजार 22 कॅरेट सोन्याची किंमत रु 48189 प्रति तोळे इतकी होती.
24 कॅरेट 52,140 रुपये प्रति तोळे
22 कॅरेट 47,800 रुपये प्रति तोळे
तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याची वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. जागतिक बाजारपेठेत रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने घसरणीचे वातावरण होते. सध्या बाजारपेठेची स्थिती हळूहळू सुधारत आहे.
देशात सणासुदीच्या काळात तसेच लग्न समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे सोन्याच्या कमी झालेल्या दरांचा फायदा या ग्राहकांना होऊ शकतो.