Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात घट नोंदवली गेली आहे. MCX (मल्टी कमोडिटी एक्सजेंच) वर सोनं आज 226 रुपयांनी घसरले आहे. सध्या सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी प्रतितोळा 73,030 रुपयांवर स्थिरावले आहे. तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या चांदी 285 रुपयांनी घसरली असून 85,383 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. सणासुदीच्या दिवसांत सोनं खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना हा मोठा दिलासा आहे. सोमवारीही सोनं स्वस्त झालं होतं. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची झळाळी कमी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर पडला आहे. निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, अमेरिकेच्या निवडणुका तसंच, फेडरल बँकेचे व्याजकपातीची शक्यता या सगळ्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे. तसंच, भारतात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याचाही परिणाम मौल्यवान धातुंच्या किंमतीवर झाला आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,940 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73,030 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,770 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 694 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 303 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 477 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 552 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 424 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43, 816 रुपये
22 कॅरेट- 66,940 रुपये
24 कॅरेट- 73,030 रुपये
18 कॅरेट- 54,770 रुपये