Gold Price Today : 8 हजार 300 रूपयांनी सोन्याच्या दरात घट; वाचा आजचे दर

जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर 

Updated: Aug 3, 2021, 01:29 PM IST
Gold Price Today :  8 हजार 300 रूपयांनी सोन्याच्या दरात घट; वाचा आजचे दर title=

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. आज देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. MCXने दिलेल्या माहितीनुसार आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 150 रूपयांनी घसरले आहेत. आज 10 ग्रॅम सोने सोने खरेदी करण्यासाठी 48 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 56 हजार रूपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. पण 2021 मध्ये सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली. आज सोन्यासाठी जवळपास  48 हजार रूपये मोजावे लागत आहेत.

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर 
दिवस                   सोने 

सोमवार                 47461/10 ग्रॅम

मंगळवार               47573/10 ग्रॅम

बुधवार                  47577/10 ग्राम

गुरुवार                 48281/10 ग्रॅम

शुक्रवार                48001/10 ग्रॅम

चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. चांदी दर 350 रूपयांनी घसरले आहेत. आज चांदीचे दर 67 हजार 500 रूपये मोजावे लागत आहेत. 

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर 

दिवस                   चांदी 

सोमवार                 67121/किलो

मंगळवार               66056/किलो

बुधवार                  66390/किलो

गुरुवार                  68200/किलो

शुक्रवार                 67847/किलो