नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत पून्हा एकदा वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
सोन्याच्या किंमतीत २२० रुपये प्रति ग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ३१,००० रुपये तोळा एवढी झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळत आहे.
चांदीच्या दरात ४७० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदी ४०,८०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते स्थानिक ज्वेलर्स, रिटेलर्स आणि सणासुदीच्या काळामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे. या सर्वांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
त्यामुळे तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला थोडे जास्तच पैसे खर्च करावे लागणार आहेत.