लॉकडाऊनमध्ये ही सोन्याच्या दरात मोठी वाढ, ५० हजारांपर्यंत पोहण्याची शक्यता

सोन्याचे भाव गगनाला भिडणार...

Updated: Apr 15, 2020, 01:46 PM IST
लॉकडाऊनमध्ये ही सोन्याच्या दरात मोठी वाढ, ५० हजारांपर्यंत पोहण्याची शक्यता title=

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान शेअर बाजारातील हालचाल मंदावली आहे. परंतु यादरम्यान, सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत. किंमती इतक्या वाढत आहेत की येत्या काही दिवसांत सोन्याचे दर दहा ग्रॅम 50,000 रुपयांपर्यंत पोचण्याशी शक्यता आहे. 

बाजार उघडताच सोन्याच्या भावात 15 एप्रिल रोजी रोजी किंमतीत मोठी वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सोने 46,445.00 रुपयांवर उघडले. सोने लवकरच 46,728 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. सकाळी 10.15 च्या सुमारास सोन्याचे भाव 374.00 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 46660.00 रुपयांवर होते. तर चांदी एमसीएक्सवर 769.00 प्रति किलोच्या वाढीसह 44525.00 रुपये प्रति किलो आहे. सोन्याच्या व्यवसायाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, जर हा ट्रेंड कायम राहिला तर येत्या काही दिवसांत प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

अपेक्षित जागतिक मंदीच्या दरम्यान सोनं महागलं

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये भीषण घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सोने जगभरातील गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीमुळे सोन्याच्या किंमतीही अलिकडच्या काळात वाढताना दिसत आहेत.

दरम्यान, सरकारने सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय दिला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या सल्ल्यानुसार सॉवरेन गोल्ड बाँड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत सहा हप्त्यांमध्ये हे बॉन्ड दिले जाईल. या अंतर्गत किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक होऊ शकते.

हे पण वाचा : धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा