Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर सोनं खरेदीचा हा चांगला दिवस ठरु शकतो. वायदे बाजारात आज मौल्यवान धातुमध्ये नरमाई आल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारातदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. वायदे बाजारात आज सोनं 120 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर, चांदीने आज MCX वर 202 रुपयांची उसळी घेतली असून आज प्रतिकिलो चांदी 84,540 रुपयांवर स्थिरावली आहे.
आतंरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 72,650 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी घसरले आहेत. आज 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 66,600 रुपयांवर स्थिरावलं आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांत सोन्याची मागणी वाढत जाते. त्यामुळं सोनं खरेदीसाठी तुम्ही आजचा दिवस निवडू शकता.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72,650 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 490 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 660 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 265 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 449 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 280 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 120 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43, 592 रुपये
22 कॅरेट- 66,600 रुपये
24 कॅरेट- 72,650 रुपये
18 कॅरेट- 54, 490 रुपये