Gold Price: सोन्याच्या वाढत्या किंमतीने (Gold Price) दररोज नवनवे रेकॉर्ड रचले जात आहेत. 2022 मध्ये दिवाळी आणि धनतेरसच्या काळात सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. नव्या वर्षातही ग्राहकांकडून खरेदीचा हा ओघ कायम राहिल अशी ज्वेलर्सना अपेक्षा होती, पण सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1615 डॉलरवरुन 1921 इतकी झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात सोनं प्रति ग्राम 5,681 रुपये झाल्याची माहिती इंडियन बुलिअन ज्लेवर्स असोसिएशनने दिली आहे. (gold price borken record for last 28 months)
गेल्या आठवड्यापासून वाढ
गेल्या आठवड्यात सोनं 28 महिन्यातील सर्वाच्च किंमतीपर्यंत पोहोचलं होतं. सोनं 56,245 रुपये प्रति 10 ग्राम इतकं महाग झालं होतं. 8 ऑगस्ट 2020 ला सोनं 56,191 रुपये प्रति ग्रामवर पोहोचलं होतं. त्यानंतर या वर्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवसात सोन्याने प्रति 10 ग्राम 56,810 रुपायांपर्यंत मजल मारली आहे.
स्थानिर बाजारात सोनं महागलं
इंडियन बुलिअन ज्वेलर्स असोसिशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाईटनुसार सोमवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत जीसटी वगळून Fine Gold (999) चा भाव 56,681 रुपयांवर ट्रेंड करत होता. याशिवाय 22 कॅरेट गोल्डची किंमत 55,450 प्रति ग्राम आणि 20 कॅरेट गोल्डची किंमत 50,560 प्रति ग्राम इतकी होती.
अमेरिकेतल्या महागाई दराचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाईच्या आकड्यांमध्ये (US Inflation) मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. डॉलरच्या निर्देशांकात घसरण झाली असून परदेशी बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारातही सोन्याचे भाव चढेच आहेत.
लग्न काळात मोठा झटका
लग्नाचा हंगाम सुरु होणार आहे, हंगामाच्या तोंडावरच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामन्य नागरिकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चांदीच्या जागतिक दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.