GOLD : घरी ठेवलेलं सोनं बनवणार मालामाल, 2.50% मिळणार व्याज, RBI चे नवे नियम

काय आहे RBI ची नवीन स्किम 

Updated: Aug 20, 2021, 10:16 AM IST
GOLD : घरी ठेवलेलं सोनं बनवणार मालामाल, 2.50% मिळणार व्याज, RBI चे नवे नियम  title=

मुंबई : तुम्ही देखील सोनं घरी ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. घरी ठेवलेलं सोनं तुम्हाला व्याज मिळवून देणार आहे. घरात एखाद्या कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवलेलं हे सोनं तुम्हाला कमाईची संधी मिळवून देणार आहे. यामधून तुमचे सोन्याचे दागिने सुरक्षितही राहणार आणि तुम्हाला कमाई देखील करून देणार आहे. (Gold Interest Bank offer 2.50 percent interest on Gold at Your Home Know About Gold Monetisation )  RBI ची हे नवे नियम बनवणार तुम्हाला मालामाल... 

घरी ठेवलेलं सोनं बनवणार मालामाल 

सोन्याकडे कायमच सुरक्षित गुंतवणूकीच्या रुपात पाहिलं जातं. कठीण प्रसंगात सोनं कामी येतं यादृष्टीकोनातून सोन्याकडे पाहिलं जातं. RBI च्या नव्या नियमांमुळे तुम्ही घरी ठेवलेल्या सोन्यातून कमाईची सुवर्णसंधी मिळणार आहे. आरबीआयच्या स्वर्ण मुद्रीकरण योजना (RBI Gold Monetisation Scheme) मार्फत एफडी सारखं सोन्यावर व्याज मिळणार आहे. ही स्कीम तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे सोनं आणि सोन्याच्या मुल्यावर व्याज मिळणार आहे. 

कुठून घेऊ शकता ही स्कीम 

जर तुम्हाला या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकसह अनेक सरकारी बँकेत गोल्ड मॉनेटाइजेशन स्कीमचा लाभ घेऊ शकता. या स्कीमच्या माध्यमातून सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकतात. बँक ग्राहकांना लाँग टर्म डिपॉझिटवर 2.50% व्याज देणार आहे. मध्यम टर्म डिपॉझिटवर 2.25% व्याज मिळणार आहे. म्हणजे घरी ठेवलेलं सोनं चक्क तुम्हाला मालामाल करणार आहे. 

काय आहे गोल्ड मोनेटाइजेशन स्कीम? 

आरबीआयच्या गोल्ड मोनेटाइजेशन स्कीमबद्दल सांगायचं तर हे एक फिक्स्ड डिपॉझिट आहे. ज्यामध्ये तुम्ही सोन्याची एफडी करू शकता. या स्कीममध्ये सोन्याची किंमत आणि म्यॅच्युरिटीप्रमाणे व्याज मिळणार. भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकते. ही गोल्ड एफडी तुम्ही सिंगल किंवा ज्वॉइंट स्वरूपातही खोलू शकतो. या स्कीममध्ये कमीत कमी 10 ग्रॅम कच्चा सोनं देखील जमा करू शकतो. 1 ते 15 वर्षांकरता तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. 

सोन्याची आताची किंमत 

सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालेला आहे. सराफा बाजारात आता सोन्याचा दर 47484 रुपये 10 प्रति ग्रॅम आहे. चांदीच्या दरात 1090 रुपयांनी वाढ झाली असून 63977 रुपये प्रति 10 किलोग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीत मंगळवारी वाढ झाली आहे. 4 महिन्यापेक्षा कमी स्तरावर सोन्याचा दर पोहोचला आहे. 

एवढं स्वस्त झालं सोन्याचा दर 

सोन्याच्या किंमतीच्या तुलनेत ऑल टाइम हाय मूल्य सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याची किंमत उच्च स्तरावर म्हणजे 8870 रुपये स्वस्त झालं आहे. 7 ऑगस्ट 2020 सोन्याच्या किंमतीत ऑल टाइम हाय मूल्यावर पोहोचलं आहे. सोन्याचा दर 10 ग्रॅम 56254 रुपये प्रति आहे. सोन्याच्या तुलनेत 8770 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीच्या किंमतीत 13121 रुपये प्रति किलोग्रॅम 63977 रुपयांवर पोहोचला आहे.