Gold Rate Today | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक वाढली; जाणून घ्या आजचे दर

भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो.

Updated: Nov 30, 2021, 01:20 PM IST
Gold Rate Today | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक वाढली; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो. सण - समारंभांमध्ये सोन्याचे असलेले महत्व याला कारणीभूत आहेच परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. 

सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. या आठवड्यात हे दर स्थिर होताना दिसत आहेत. 23 नोव्हेंबरच्या मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात प्रति तोळे 400 ते 500 रुपयांची वाढ झाली होती. 
 
सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचे भाव 48 हजार 136 रुपये प्रतितोळे इतके आहे. तर चांदीचे भाव 62 हजार 441 रुपये प्रतिकिलो इतके आहे. 
  
दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 
  
सातत्याने वाढ होत असतानाही सोने विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही खरेदी करायची असेल तर लवकर करा.
  
 मुंबईतील सोन्याचे दर
 30 नोव्हेंबर 48,310 रुपये प्रति तोळे 
 29 नोव्हेंबर 48,310  रुपये प्रति तोळे
 28 नोव्हेंबर 48,320 रुपये प्रति तोळे
 27 नोव्हेंबर 48,310 रुपये प्रति तोळे
 26 नोव्हेंबर 47,940 रुपये प्रति तोळे 

विक्रमी उच्चांकापेक्षा 8 हजार रुपयांनी सोने स्वस्त
ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर future वर MCX वर सोने 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. म्हणजेच ते अजूनही सुमारे 8000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care app'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही. तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.