नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील सरफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसलं. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,४७५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही १५० रुपयांनी वाढ होत ३९,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी व्यापाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत पहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात ४.७५ टक्क्यांनी वाढ होत ते १,३३३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात वाढ होत १६.३७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.