नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ

पहिल्याच दिवशी सोनं महागलं

Updated: Jan 1, 2019, 05:37 PM IST
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ title=

मुंबई : वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे. सोनं २०० रुपयांनी वाढून ३२४७० रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. मागणी वाढताच सोन्याच्या भावात वाढ झाली. दुसरीकडे चांदीची मागणी वाढल्याने चांदी देखील १५० रुपयांनी महागली. चांदी आज ३९२५० रुपये झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं १२८२.१७ डॉलर प्रति औंस तर चांदी १५.४४ डॉलर प्रति औंस झाली आहे. दिल्ली सर्राफा बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोनं २०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३२४७० आणि ३२३२० रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे.

२०१८ मध्ये सोन्याच्या भावात १८७० रुपयांची वाढ झाली होती. ३० डिसेंबर २०१७ ला सोन्याचा भाव ३०४०० रुपये होता. तर चांदी देखील ८८० रुपयांनी वाढली आहे. ३० डिसेंबर २०१७ ला चांदी ३९९८० रुपये प्रति किलो होती.