Gold Rate : सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसून येत आहे.  

Updated: Aug 30, 2020, 11:16 AM IST
Gold Rate : सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही असा प्रश्न ग्राहकांना उपस्थित होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. कधी सोन्याचे दर वाढतात तर कधी अचानक किंमतीत घट होते. अशीच स्थिती चांदीची देखील आहे. या महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 

अरे वाह! 6000 रुपये सस्ता हो गया है सोना, यहां जानिए क्या है ताजा भाव

काही दिवसांपूर्वी उच्चांक गाढलेल्या सोन्याच्या किंमतीत या महिन्यात ५ हजार रूपयांपर्यंत घट झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर ५६ हजार रूपयांवर पोहोचले होते. परंतु आता प्रति १० ग्रॉम सोन्याचे दर ५१ हजार रूपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. 

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांत २५२ रूपयांनी घट झाली आहे. त्यामुळे १० ग्रॉम सोन्याचे दर ५२ हजार १५५ रूपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर मात्र वधारले आहेत. ४६२ रूपयांच्या उच्चाकांनुसार चांदीचे ६८ हजार ४९२ रूपयांवर पोहोचले आहेत.  गेल्या बाजारात चांदीचे दर ६८ हजार ३० रूपये होते