नवी दिल्ली : सोन्या, चांदीच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून सतत चढताना दिसत असताना आज त्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमी झालेली मागणी आणि ज्वेलर्सकडून कमी झालेली मागणी पाहता दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचे पाहालया मिळत आहे. सोन ५० रुपयांच्या घसरणीसह ३२,४०० रुपये प्रति ग्रामच्या स्तरावर पोहोचली आहे. तसेच चांदी १५० रुपयांच्या घसरणीसह ४०,५५० रुपये प्रति.कि स्तरावर पोहोचली आहे. इंडस्ट्रियल यूनिट्स आणि नाणी निर्मात्यांकडून कमी मागणी पाहता ही घसरण पाहायला मिळत आहे.
२५ एप्रिल रोजी दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा २२५ रुपयांनी वाढून३२,४५० रुपये प्रति दहा ग्रामवर दाखल झाली. चांदीची किंमतही 200 रुपयांनी वाढ होऊन ४०,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. अक्षय तृतीयानंतर ( १८ एप्रिल) जवळपास आठवड्याभरानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा चढ्या होत्या. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचा भाव ३२,२३० रुपये प्रति दहा ग्रामवर होता. परदेशात सोन्याची मागणी घटली असली तरी देशात मात्र लग्नसराईमुळे स्थानिक सोनारांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसतेय.
सोन्याच्या किंमतीत थोडीफार नाही तर दखल देण्याजोगी वाढ झालीय. केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल १०७० रुपयांची वाढ झाली होती. २३ एप्रिल रोजी दिल्लीत सोन्याच्या किंमती ३१,२८० रुपये प्रति दहा ग्रामवर होत्या. २४ एप्रिल रोजी हा आलेख चढता राहिला... आणि किंमती ३२,०७५ रुपयांवर दाखल झाल्या होत्या.