सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा काय आहेत आजचे दर

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Sunil Desale Updated: Apr 2, 2018, 05:45 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा काय आहेत आजचे दर title=
Representative Image

मुंबई : सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतराराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी आणि दर वाढल्याने राज्यांत सोने भाव वाढला आहे. लग्न विवाह सोहळ्याच्या  दिवसात सोने भाव वाढला आहे. पाहूयात काय आहेत सोनं आणि चांदीचे सध्याचे दर...

किती झाले दर

सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा ३१,४६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

चांदीच्या दरातही वाढ

दिल्लीतील सराफ बाजारात चांदीच्या दरात १७५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर ३९,३७५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

शनिवारीही झाली सोन्याच्या दरात वाढ

देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं ११० रुपयांनी महागत क्रमश: ३१,४६० रुपये आणि ३१,३१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ५० रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं.

सराफ बाजारात मोठी मागणी

बाजारातील तज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापाराच्या तणावामुळे सराफ बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.

वैश्विक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.४४ टक्क्यांनी वाढ होत १,३३०.८० डॉलर प्रति औंस झाली आहे. तर, चांदीही ०.५५ टक्क्यांनी वाढल्याने १६.४४ डॉलर प्रति औंसवर पोहोचली.