ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 08:31 PM IST
ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ title=
File Photo

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं प्रति तोळा ३०,८३० रुपयांवर पोहोचलं आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात २३५ रुपये दराने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलोग्रॅम ४१३०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातील वाढ ही इंस्ट्रीयल यूनिट्स आणि शिक्के निर्मात्यांनी केलेल्या भरघोस मागणीमुळे पहायला मिळत आहे. 

व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही मागणी पाहता सोनं महागलं आहे. तसेच अमेरिकन फेडरलने सप्टेंबर पॉलिसी बैठकीत मिनट्समध्ये महागाई दरात झालेल्या घटीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं ८० रुपयांनी महागत क्रमश: ३०,८३० रुपये आणि ३०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यंदाच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत १५ रुपयांची किरकोळ घट पहायला मिळाली आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही २३५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा सध्याचा दर ४१,३०० रुपये प्रति तोळा झाला आहे.