नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. सोमवारी सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढला. सोनं आज 32,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचलं आहे. दुसरीकडे चांदीची मागणी वाढल्याने चांदीचा भाव देखील 150 रुपयांनी वाढला आहे. चांदी 38,150 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात लंडनमध्ये सोनं आज दोन डॉलरने घसरलं. सोनं 1,207.60 डॉलर प्रति औंस झालं आहे. अमेरिकेत सोनं 1.10 डॉलरने घसरुन 1,207.50 डॉलर प्रति औंस झालं आहे. यादरम्यान चांदी 0.07 डॉलरने घसरले असून 14.17 डॉलर प्रति औंस झाली आहे.
अभ्यासकांच्या मते, जगात प्रमुख मुद्रा असलेला डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे भारतात मात्र सोनं महागलं आहे.