सोनं आणि चांदी महागली, डिसेंबरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता

सोनं आणि चांदी पुन्हा महागली

Updated: Nov 17, 2018, 05:01 PM IST
सोनं आणि चांदी महागली, डिसेंबरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : सर्राफा बाजारात मागणी वाढल्यामुळे आणि ग्राहकांनी देखील सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केल्यामुळे आज सोनं 135 रुपयांनी वाढलं आहे. सोनं आज 32,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. चांदी देखील 250 रुपयांनी वाढलं आहे. चांदी 38,150 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याचा परिणाम स्थानिक बाजारात देखील पाहायला मिळाला. येणाऱ्या दिवसात सोनं आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लंडनमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये सोनं 7.90 डॉलर म्हणजेच 0.65 टक्क्यांनी वाढून 1,221.35 डॉलर प्रति औंस झालं. डिसेंबरमध्ये अमेरिकेत सोनं सात डॉलरने वाढण्य़ाची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अमेरिकेत सोनं 1,222 डॉलर प्रति औंसवर जाऊ शकतं. 

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.14 डॉलरने वाढून 14.39 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. विश्लेषकांच्या मते, जगभरातील अन्य मुद्रा डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याने ही वाढ पाहायला मिळाली. येणाऱ्य़ा दिवसात सोनं-चांदी आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय.