सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

कोरोना लसीचा परिणाम 

Updated: Nov 24, 2020, 08:20 PM IST
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर  title=

मुंबई : देशभरात आता लग्नांचा सिझन सुरू झाला आहे. या काळात सोन्या-चांदीला अधिक मागणी असते. (Gold-Silver Price) सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर सोने-चांदीची खरेदी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी घसरण झाली आहे. 

दिल्ली सराफा बाजारातील दर 

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर हा १०४९ रुपये कमी झालं आहे. चांदीच्या दरात १५८८ रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाला आहे. तज्ञांच म्हणणं आहे की, कोरोना व्हॅक्सीन लवकरच येण्याची चिन्ह असल्यामुळे याचा दबाव वाढला आहे. 

तसेच या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये १० लाख टक्क्यांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर १०४९ रुपयांनी खाली आला असून आताचा दर ४८५६९ रुपये इतका आहे. या अगोदर दर ४९६१८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर १५८८ रुपयांनी खाली उतरला असून आता ५९३०१ रुपयांवर थांबला आहे. चांदीचा दर या अगोदर ६०८८९ रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर हा १८३० डॉलर प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर हा २३.४२ डॉलर प्रति आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हॅक्सीनची आशा आणि बायडन यांचा व्हाइट हाऊसमधील प्रवेश यांचा प्रभाव सोन्याच्या दरावर झाला आहे.