Goa News : गोवा अनेकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक गोव्यात फिरण्यासाठी येतात. मात्र, वाहतूक पोलीसांमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत भाजपच्या आमदारांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली आहे. गोव्यात येणारे पर्यटक फिरण्यासाठी भाड्याने गाड्या घेतात. मात्र, वाहतूक पोलीस कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने पर्यटकांचा छळ करत असल्याचे आमदारांनी तक्रारीत म्हटलं आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो, केदार नाइक आणि डेलिलाह लोबो या तिघांच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांची भेट घेतली. गेल्या वर्षाशी तुलना केली असता या वर्षी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. तपासणीच्या नावाखलाी विविश्ध त्रुटी काढत वाहतूक पोलिस पर्यटकांकडून मोठा दंड आकार असल्याचा आरोप भाजप आमदरांनी केला आहे.
पर्यटन व्यवसाय हे गोव्याच्या महसुलाचे मुख्य माध्यम आहे. पण वाहतूक पोलिसांच्या त्राासमुळे पर्यटकांची सख्या रोडावली आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पर्यटकांना लुटणारे वाहतुक पोलिसांचे मोठे रॅकेटच सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाड्याने दुचाकी किंवा इतर वाहन घेणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलीस अडवून ठेवतात आहे. आवश्यक कागदपत्र दाखवल्यानंतरही जवळपास 15 ते 20 मिनीटे पर्यटकांना विनाकारण थांबवून ठेवले जाते. चौकशीच्या नावाखाली पर्यटकांना त्रास देऊ नसे अशा सूचना वाहतूक पोलिसांना देणार असल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितल्याचाे आमदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले.
पर्यटकांच्या सोईसाई एक क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्यात विचार आहे. क्यूआर कोड प्रणाली सुरू झाल्यास एकदा एखाद्या पर्यटकाच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्याची दुसऱ्यांदा तपासणी केली जाणार नाही, यासाठी ही प्रणाली असेल असं डीजीपीने सांगितल्याचं आमदार केदार नाइक यांनी सांगितलं.