भोपाळ : शिर्षक वाचून कदाचीत तुम्हालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. पण, वास्तवातच अशी घटना घडली आहे. पाळीव उंदराचा मृत्यू झाल्याने एका मुलीने आत्महत्या केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपळ येथे ही घटना घडली. उंदीर मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचे समजते.
भोपाळ येथील अयोध्यानगर येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, अयोध्या नगर पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत मुलगी दिव्यांशी राठोड ही वडील महेंद्र सिंह राठोड आणि कुटुंबियांसोबत आयोध्या नगरातील सुरभी येथे राहते. दिव्यांशी ही इयत्ता 7 वीत शिकते. तिला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तिच्या वडीलांनी सांगितले की, दिव्यांशी हिला पाळीव प्राण्यांबाबत प्रचंड प्रेम होते. तिचे हे प्रेम पाहून ते तिला एक पांढरा उंदीर घेऊन आले होते.
काही काळातच दिव्यांशीचे उंदरासोबत प्रेमाचे नाते बनले. दरम्यान, शुक्रवारी अचानक उंदराची प्रकृती बिघडली. त्यानंतर काही काळात उंदराचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंदराच्या मृत्यूचा दिव्यांशीला मानसीक धक्का बसला. त्यातून ती बाहेर आली नाही. तिली बसलेला धक्का इतका तीव्र होता की, ती शाळेलाही गेली नाही. तसेच, उंदराचे मृत शरीर तिने वडीलांना फेकुही दिले नाही. तिने आपल्या घरातच उंदरासाठी एक खड्डा खणला. त्या खड्ड्यात उंदराचा दफनविधी केला. तसेच, ती जागा फुलांनी सजवली.
दरम्यान, दिव्यांशीने उंदीर मेल्याची माहिती आपल्या मित्र, मैत्रीनिंनाही दिली. त्यावेळी तिचे वडीलही घरी होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास दिव्यांशीने घरातील एका खोलीस स्वत: बंद केले. घरच्यांनी दरवाजा उघडून पाहिले तेव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घरात केलेल्या तपासात कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. पोलीस पूढिल प्रकरणाचा तपास करत आहेत.