चिमुरडीचं डोकं हंड्यामध्ये अडकले अन्...

हंडा कटरने कापून या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आलं.

Updated: Jul 30, 2018, 10:51 PM IST
चिमुरडीचं डोकं हंड्यामध्ये अडकले अन्... title=

जयपूर: राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका चिमुरडीचं डोकं स्टीलच्या हंड्यामध्ये अडकल्याचा प्रकार घडला. घरामध्ये खेळत असताना ७ वर्षांच्या या मुलीने हंड्यात डोके घातले. मात्र, ते बाहेर येईना. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी तिला उचलून दवाखान्यात आणले. सुरुवातीला डॉक्टरांनी अलगदपणे मुलीचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही केल्या मुलीचे डोके हंड्यातून बाहेर निघत नव्हते. अखेर हंडा कटरने कापून या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.