2019 वर्षे मिथुन राशीसाठी कसे असेल ?

 मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी 2019 हे वर्षे गुडलक ठरणार आहे. 

Updated: Dec 31, 2018, 09:10 PM IST
2019 वर्षे मिथुन राशीसाठी कसे असेल ? title=

मुंबई : जगभरात 2018 ला निरोप आणि नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. काही तासांतच आपण नववर्षात पदार्पण केलेलं असेल. अशावेळी नव्या वर्षात काय करायला हवं ? काय टाळायला हवं याचं प्लानिंग सुरू झालंय. अगदी सकाळी उठून व्यायामाला जाण्यापासून ते नोकरी बदल्यापर्यंत सर्व काही मनात ठरवलं जातंय. पण येणारं वर्ष आपल्यासाठी नेमकं कसं असेल याची काळजी प्रत्येकाला असतेच. मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी 2019 हे वर्षे गुडलक ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष करिअर, पारिवारीक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्यासाठी कसे असेल याबद्दल जाणून घेऊया.

नोकरीत बढती 

मिथुन राशीसाठी नवे वर्ष चांगले-वाईट, कर्ज देणारेही ठरू शकते. सुरूवातीचे महिने चांगले असतील. जुलै नंतर यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पण ऑगस्ट महिना सर्वात शुभ ठरणारा असेल. करिअर-नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यासाठी नशिबाची साथ मिळेल.बढती आणि पगार वाढीचे देखील योग संभावतआहेत.

आरोग्याकडे लक्ष द्या 

पारिवारीक जीवन आणि सामाजिक कार्यांमुळे समाजात इज्जत वाढेल. पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. तुम्ही नवे दुकान किंवा जमीन खरेदी करु शकता. परिवारातील मंडळींसोबत बाचाबाची होऊ शकते. व्यवसायाता अडलेला पैसा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आरोग्यामध्ये उतार चढाव पाहायला मिळणार आहेत. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x