जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी

एलओसीवर गणपती बाप्पा मोरया

Updated: Aug 28, 2019, 06:45 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी  title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पुंछ मधल्या नियंत्रण रेषेजवळच्या परिसरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. सीमेवर गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे. एलओसीवर गणपती बाप्पांचा जयघोष होणार आहे.

एलओसी वर गणपती बाप्पा मोरया 

अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पुंछच्या सीमावर्ती भागात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा कऱण्याची तयारी सुरू झाली आहे. LOC वर प्रतिष्ठापना करण्यासाठी खास मुंबईतून किंग ऑफ LOC नावानं बाप्पाची मूर्ती घडवून घेण्यात आली आहे. जी आपल्या ताब्यात घेण्यासाठी काश्मिरी पंडितांचा एक समुह मुंबईत दाखल झाला आहे.

मुंबईतून बाप्पाच्या खास तीन मूर्ती घडवून घेण्यात आल्या आहेत. 3 फुटांपासून 7 फुटांपर्यंत बाप्पाच्या या मूर्ती आहेत. यांना किंग ऑफ LOC असं नाव देण्यात आहे.

गणपती बाप्पाच्या या मूर्ती खास भारतीय सैन्यदलाच्या सुरक्षेत पुंछकडे रवाना झाल्या आहेत. गणपती बाप्पाच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमावर्ती भागात 10 दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी केली जाईल. या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागे एक गोष्ट आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या जवांनांचा नवस म्हणून काश्मिरी पंडित किरण या ठिकाणी बाप्पाची प्रतिष्ठापना करते. मागच्या 10 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.

गणेशोत्सवात जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात साजरा होणारा कदाचित हा एकमेव गणेशोत्सव आहे.