JEE-NEET विद्यार्थ्यांच्या मदतीकरता NTA ऍप लाँच

मॉक टेस्टची तयारी करून घेणार हे ऍप 

Updated: May 21, 2020, 11:07 AM IST
JEE-NEET विद्यार्थ्यांच्या मदतीकरता NTA ऍप लाँच  title=

मुंबई : NEET,JEE(main) Preparation App मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंकने JEE-NEET विद्यार्थ्यांच्या तयारीकरता एका नव्या ऍपची घोषणा केली आहे. त्यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून तयार करण्यात आलेल्या या ऍपद्वारे विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या आग्रहानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक यांना याबाबत माहिती दिली होती. त्यांनी हे ऍप तयार केलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे. 

स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या मागणीकरता हे ऍप तयार करण्यात आलं आहे. एनटीए संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य आणि राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (नीट) च्या तयारीकरता नॅशनल टेस्ट अभ्यास ऍप निर्माण करण्यात आलं आहे. यामुळे इंजिनियरिंग, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारी करता मदत मिळणार आहे. 

या ऍपमुळे जेईई मेन, एनईईटीच्या मॉक टेस्टमध्ये सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. या परिक्षेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी मॉक टेस्टची तयारी करत असतात. यामुळे या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. याद्वारे विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतात. ऍपमध्ये त्यांना तात्काळ निकाल कळणार आहे. यासोबत प्रश्नांची उत्तर देखील मिळणार आहे. वेगवेगळ्या सेक्सनमध्ये विद्यार्थ्यांनी वेळ घालवला याची देखील माहिती मिळणार आहे. यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं याची माहिती मिळणार आहे.