Sharad Yadav Passed away : JDU चे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

शरद यादव यांच्या निधनाबाबत त्यांच्या मुलीने ट्विट करत माहिती दिली आहे.

Updated: Jan 13, 2023, 12:17 AM IST
Sharad Yadav Passed away : JDU चे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन title=

JDU Sharad Yadav Passed away :  जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्यावर गुरुग्राममधील फोर्टीन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. शरद यादव यांच्या मुलीने ट्विट करून माहिती दिली आहे. (Former JDU president Sharad Yadav passed away latest marathi News)

मधेपुरा लोकसभा मतदारसंघामधून यादव यांनी चार वेळा प्रतिनिधित्त्व केलं होतं. त्यासोबतच मध्य प्रदेशातील जबलपूरमधील दोनदा आणि उत्तर प्रदेशातील बुदौनमधून एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. शरद यादव हे देशातील  पहिले असे राजकारणी होते की, जे तीन राज्यांमधून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.  2013 साली त्यांची पक्ष एनडीएमधून बाहेर पडल्यावर शरद यादव यांनी संयोजकपदाचा राजीनामा दिला होता.

1 जुलै 1947 ला मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथे बंदाई गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता. विद्यार्थी राजकारणातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये छाप पाडत बिहारच्या राजकारणात मोठं नाव कमावलं होतं. यादव यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यश मिळवलं होतं.