ताजमहलची सुरक्षा वाऱ्यावर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ताजमहालचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारत देशात दाखल होतात.

Updated: Oct 17, 2019, 02:32 PM IST
ताजमहलची सुरक्षा वाऱ्यावर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : आग्रा येथे वसलेलं ताजमहालचं सौंदर्य पाहून प्रत्येक नागरिक थक्क होतो. शहाजहानने प्रियपत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहालासारखी अलौकिक कलाकृती उभारली. मात्र आता या ऐतिहासिक वास्तुकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ताजमहालचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारत देशात दाखल होतात. तर आता परदेशी पर्यटकांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परदेशी पर्यटक ताजमहालच्या मुख्य स्मरकाबाहेर मार्शल आर्टचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बुधवारचा असल्याचं समोर येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा दल याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. परंतु ते परदेशी नागरिक कोण होते, त्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. 

ताजमहल सोबतच कोणत्याही ऐतिहासिक स्मारकाबाहेर पारंपरिक रितींव्यतिरिक्त कोणतेही उपक्रम राबवण्यावर प्रतिबंध आहे. तरी देखील विदेशी पर्यटकांनी ऐतिहासिक स्मरकाबाहेर व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

त्यामुळे एएसआई कडून होणारं दुर्लक्ष समोर येत आहे. यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. तेव्हा परदेशी महिलांनी या ठिकाणी आपल्या नृत्याचे प्रदर्शन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.