वापरात नसलेलं Demat Account असं करा बंद, जाणून घ्या सोप्पी पद्धत

वापरात नसलेलं डिमॅट अकाउंट बंद करणंच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरु शकतं. हे डिमॅट अकाउंट कसं बंद करायचं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Sep 9, 2022, 05:57 PM IST
वापरात नसलेलं Demat Account असं करा बंद, जाणून घ्या सोप्पी पद्धत title=

मुंबई : शेअर बाजारात ट्रे़डिंग करण्यासाठी आवश्यकता असते ती डीमॅट अकाउंटची (Demat Account) कोरोनाच्या काळात अनेकांनी डिमॅट अकाउंट रजिस्टर करुन ट्रेडिंग केलं. या काळात डिमॅट अकाउंटच्या रजिस्ट्रेशची संख्याही वाढली पण कालांतराने त्यापैकी अनेक अकाउंटचा वापर बंद झाला आहे. अशावेळी, वापरात नसलेलं डिमॅट अकाउंट बंद करणंच फायद्याचं ठरु शकतं. त्याचं कारण म्हणजे, तुमच्या वापरात नसलेल्या डिमॅट अकाउंटवर तुम्हाला अ‍ॅन्यूअल फील आणि मेंटेनेंस चार्ज भरावा लागणार नाही.

वापरात नसलेलं डिमॅट अकाउंट कसं बंद करायचं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डिमॅट अकाउंट (Demat Account) बंद करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तरी प्रक्रिया ही ऑफलाईनच आहे. 

डिमॅट अकाउंट कसं बंद करायचं?

- सर्वात प्रथम तुम्हाला NSDL च्या डिपी (डिपॉजिट पार्टिसिपेंट) ऑफिसमध्ये किंवा ब्रांचला जावं जाऊन तुम्हाला फॉर्म आणि डॉक्यूमेंट सबमिट करावं लागेल.
- अकाउंटहोल्डर डिपॉजिटरी पार्टिसिपेंटच्या वेबसाईटवरुन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करु शकतात. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढू शकता.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल?

- तुम्हाला तुमचा DP ID आणि Client ID द्यावा लागेल.
- रेकॉर्डमध्ये असणारी डिटेल्स भरावे लागतील. (जसे की, नाव आणि पत्ता)
- तुम्हाला अकाउंट बंद करण्याचं कारण देखील सांगावं लागेल.
- त्या अकाउंटच्या सर्व होल्डर्सला क्लोजर रिक्वेस्ट फॉर्मवर सही करावी लागेल.

- तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम बॅलेंस असेल तर त्या रक्कमेला ट्रांसफर करावं लागेल. तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये बॅलेंस रक्कम कोणत्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायची याचा माहिती द्यावी लागते. बॅलेंस ट्रान्सफर एका डिलीव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप फाईल करुन देखील केली जाऊ शकते.

- तुमचा फॉर्म जमा झाल्यानंतर सात ते दहा दिवसांमध्ये तुमचं अकाउंट बंद होतं. डीमॅट अकाउंट (Demat Account) बंद करण्यासाठी कोणतीही फीस लागत नाही. जर अकाउंटचं बॅलेंस निगेटिव्हमध्ये असेल तर तुम्हाला ती रक्कम देखील अकाउंट बंद करण्याआधी सेटल करावं लागेल.