आसाममध्ये महापुराचं रौद्र रूप, 30 जणांनी गमावला जीव

पूर्वोत्तर भारतातील महापुराचं रौद्ररुप दाखवणारा व्हिडीओ, पाहा भयवह परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट

Updated: Jun 19, 2022, 10:27 AM IST
आसाममध्ये महापुराचं रौद्र रूप, 30 जणांनी गमावला जीव title=

नवी दिल्ली : पूर्वोत्तर भारतातील अनेक ठिकाणी मुसधार पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली. कुठे ट्रेन रुळावरून घसरली तर कुठे रस्ते-पूल वाहून गेले. लाखो लोकांना पुराचा फसका बसला आहे. 

आसाममध्ये पुरानं थैमान घातलं आहे. ब्रह्मपुत्रा नदी धोक्याची पातळी गाठली आहे. 28 जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. तर 19 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. 

आतापर्यंत 30 जणांचा बळी गेला आहे. 1 लाख 30 नागरिकांना सुखरूप ठिकाणी घेऊन जाण्यात आलं आहे. सुमारे 20 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. या महापुरामुळे आसामसह तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथले फोटो व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत.