रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शिरले मासे

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पावसाचे खराब पाणी घुसले होते.

Updated: Jul 29, 2018, 11:09 PM IST
रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शिरले मासे title=

पाटणा: बिहारच्या नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नुकतीच घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. याचा फटका नालंदा रुग्णालयालाही बसला. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पावसाचे खराब पाणी घुसले होते. यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे या साचलेल्या पाण्यात मासे पोहताना आढळून आले. अतिदक्षता विभागासह रुग्णालयात बराच काळ माशांचा मुक्तसंचार सुरु होता. 

  या परिस्थितीमुळे डॉक्टरांना अशा पाण्यातच रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली होती. हे शासकीय रुग्णालय असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून त्याची ओळख आहे. याचे आवार १०० एकरचे असून रुग्णालयात ७५० खाटा आहेत. या परिस्थितीमुळे रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना रात्रभर मिळेल त्या कोपऱ्यात उभे राहून पाणी सरण्याची वाट पहावी लागली.