Corona : रशियाची स्पुतनिक-व्ही लस भारतात दाखल, लसीकरणात होणार फायदा

कोरोना विरुद्धच्या लढ्यात होणार फायदा

Updated: May 1, 2021, 05:22 PM IST
Corona : रशियाची स्पुतनिक-व्ही लस भारतात दाखल, लसीकरणात होणार फायदा title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात कहर सुरु असताना रोज संसर्ग झालेल्यांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. सरकारने लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू केला, कोरोनाविरूद्ध लढा तीव्र झाला आहे. ज्यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना कोविड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड लसीच्या कमतरतेबद्दल अनेक राज्य सरकार तक्रारी करत आहेत. दरम्यान, रशियातील कोविड लस स्पुतनिक-व्ही ची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे.

भारतात स्पुतनिक-व्ही लसमुळे कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये बरीच मदत होईल. अलीकडेच केंद्राने आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे कोओशिल्ड आणि कोवाक्सिन सह स्पुतनिक-व्हीच्या मदतीने देशातील कोरोनाविरूद्ध लढा आणखी मजबूत होणार आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरुन देशातील कोरोना संकटाबाबत चर्चा केली. यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले.

पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार पुतीन यांनी स्पुतनिकला भारतात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एएनआयने रशियामधील भारताचे राजदूत बाला व्यंकटेश वर्मा यांच्या हवाल्याने सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीला भारताला दीड लाख ते दोन लाख तयार लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात स्पुतनिक-व्ही लसीचा पुढील आठवड्यांध्ये देखील पुरवठा होत राहील. कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईतील हे निश्चितच एक मोठे शस्त्र असल्याचे सिद्ध होईल.

अहवालात असे म्हटले आहे की, येत्या महिन्याभरात स्पुतनिक-व्ही लसीचा भारतात 50 लाख डोस पोहोचण्याची शक्यता आहे. ही मदत अशा वेळी आली आहे जेव्हा भारतात एका दिवसात 4 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यासह आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 32 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासह मृतांचा आकडा देखील वाढला आहे.