दिल्लीत कपड्याच्या गोदामाला आग; ९ जणांचा मृत्यू

आगीत १० जण जखमी...

Updated: Dec 23, 2019, 08:22 AM IST
दिल्लीत कपड्याच्या गोदामाला आग; ९ जणांचा मृत्यू  title=
फोटो सौजन्य : ANI

नवी दिल्ली : दिल्लीतील किरारी भागात कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. 

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. परंतु आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. आगीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या भीषण आगीत तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर इतर ६ जणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.