नवी दिल्ली : जम्मु काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे वरिष्ठ नेते फारूक अब्दुल्ला हे झी मीडियाच्या एका कार्यक्रमात भावू झालेले पहायला मिळाले. 'Zee India Conclave' या कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले, 'माहीत नाही का, पण मुसलमान असूनही मला रामाबद्धल प्रचंड प्रेम आहे', या कार्यक्रमात फारुक अब्दुल्ला यांनी एक भजनही म्हटले.
'मोरे राम...जिस गली गयो मोरे राम, जिस गली गयो मोरे राम,
मोरा आंगन, सुना-सुना, जिस गली गयो मोर राम,
मोरे श्याम, जिस गली गयो मोरे राम,
सखी-सखी ढूंढो कहां गयो मोरे राम।
#ZeeIndiaConclaveमध्ये बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू मला मुसलमान तर, मुसलमान मला हिंदू समजतात. याच कार्यक्रमात अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, जम्मू काश्मीर प्रश्नावर जरूर तोडगा निघेल. पण, हे माहित नाही की तो केव्हा निघेल. पुढे ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर परत मिळू शकत नाही. तसेच, काश्मीरमधील पाकची घुसखोरीही थांबू शकत नाही. या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांना मिळून तोडगा काढावा लागेल.