Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

Stubble burning in Khanauri border : खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे

सौरभ तळेकर | Updated: Feb 21, 2024, 09:19 PM IST
Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी! title=
Stubble burning in Khanauri border

Punjab Haryana border : हरियाणातील खनौरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू (A farmer was killed in firing) झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. तर हरियाणा पोलिसांनी असं काही झालं नसल्याचा दावा केलाय. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलण्याची घोषणा केली. पंजाबला हरियाणाशी जोडणाऱ्या खनौरी सीमेजवळ (Khanauri border) मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. 

खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस (Haryana Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे. पराली काढून शेतकऱ्यांनी जाळली अन् त्यावर मिर्ची पावडर टाकली. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेने शेकऱ्यांनी पोलिसांना चोख प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांच्या मिर्ची पावडर क्लृतीमुळे पोलिसांची चांगलीच दैना उडाल्याचं पहायला मिळालं. मिरची पूड जाळल्याने निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा हरियाणा पोलिसांनी केला आहे.

दाता सिंह-खानोरी सीमेवर आंदोलकांनी पोलिसांना चारी बाजूंनी घेराव घातला, मिरची पावडर टाकून पोलिसांवर दगडफेकीसह लाठ्या-काठ्यांचा वापर केला, सुमारे 12 पोलिस गंभीर जखमी झाले, असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन देखील केलंय. तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गाझीपूर सीमेचं छावणीत रूपांतर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली हद्दीत जाण्याचा संकल्प केल्यानंतर पोलिसांनी येथे कडक बंदोबस्त वाढवला आहे. त्याचबरोबर पूर्व दिल्लीच्या तीन रेंजमध्ये 3000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

राहुल गांधीची टीका

खनौरी सीमेवर गोळीबारात तरुण शेतकरी शुभकरन सिंह यांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे, त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. गेल्या वेळी 700 हून अधिक शेतकऱ्यांच्या बलिदानानंतरच मोदींचा उद्दामपणा स्वीकारला होता, आता तो पुन्हा त्यांच्या जीवाचा शत्रू झाला आहे. मीडियाच्या मागे लपलेल्या भाजपकडून शेतकऱ्यांच्या हत्याचा हिशेब एक दिवस इतिहास नक्कीच मागेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.