महिलांच्या खात्यात खरोखर येणार २ लाख रुपये? जाणून घ्या सत्य काय?

सोशल मीडियाचा जसा फायदा आहे, तसाच तोटाही आहे. सोशल मीडियीवर आपल्याला मिळणारे सर्वच मेसेज हे खरे असतातच, असं नाही

Updated: Nov 23, 2021, 08:52 PM IST
महिलांच्या खात्यात खरोखर येणार २ लाख रुपये? जाणून घ्या सत्य काय? title=

मुंबई | सोशल मीडियाचा जसा फायदा आहे, तसाच तोटाही आहे. सोशल मीडियीवर आपल्याला मिळणारे सर्वच मेसेज हे खरे असतातच, असं नाही. अनेक जण आपल्याला मिळालेल्या मेसजची खातरजमा न करताच फॉरवर्ड करतात. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये शासकीय योजनाचं प्रमाण अधिक असतं. असाच एक व्हीडिओ व्हायरल होतोय, ज्यात केंद्र सरकार महिलांना 2 लाख 20 लाख रुपये आणि कर्ज म्हणून 25 लाख देणार असल्याचा दावा केला जातोय. या व्हायरल मेसेजची सत्यता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. (faqt check of central governmet provide 2 lakh 20 thousand for women This is true or not see in this news)
 
फेक मेसेजमध्ये नेमकं काय?

केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजना' सुरु केली आहे. या योजनेनुसार महिलांना 2 लाख 20 हजार रोख मिळणार आहेत. तर 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज विनव्याजी आणि विनातारण असेल, असं या व्हायरल मेसेजमध्ये म्हंटलं आहे. या व्हायरल मेसेजमध्ये महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला ही रक्कम कशी मिळणार, याबाबत संभ्रमही आहे.  

या व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता पडताळणी झी 24 तासने केली. तेव्हा हा मेसेज फेक असल्याचं समोर आलं. तुमच्याकडे अशा आशयाचा मेसेज, एखादा व्हीडिओ किंवा पोस्ट आली असेल, तर तो बनावट आहे, असं पीआयबीनेही नमूद केलं आहे. 

पीआयबीचं स्पष्टीकरण

केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही. या व्हायरल मेसेजला बळी पडू नका. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अशा प्रकारचा कोणताही फेक किंवा आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट आली तर आम्हाला कळवा, असं आवाहन पीआयबीने केलंय. त्यामुळे तुम्हीही अशा कोणत्याही फेक मेसेजला बळी पडू नका.