आकाशात अवतरला महाकाय ड्रॅगन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

आकाशात अवतरला महाकाय ड्रॅगन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Updated: Oct 4, 2022, 12:18 AM IST
आकाशात अवतरला महाकाय ड्रॅगन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? title=

Viral Video :  तुम्ही विशालकाय ड्रॅगन पाहिलाय का? आग ओकणारा ड्रॅगन पुन्हा आलाय.होय, एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामध्ये ड्रॅगन पुन्हा आल्याचा दावा करण्यात आलाय आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

आकाशात आग ओकणारा हा ड्रॅगन पाहून थरकाप उडेल. ड्रॅगन तुम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिला असेल पण, या व्हिडिओत पाहा. एक महाकाय ड्रॅगन हवेत उडताना दिसत आहे आणि त्याचे मोठे तोंडही उघडण्याचा प्रयत्न करतोय...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टेडियमवर आकाशात उडणारा एक ड्रॅगन किती धोकादायक दिसतोय...हा व्हिडिओ वा-याच्या वेगानं व्हायरल झाल्याने पुन्हा ड्रॅगन आलाय की काय?...अशी पुन्हा चर्चा सुरू झालीय. हा प्राणी लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. मात्र, आजच्या युगातही काही वेळा लोक हा प्राणी पाहिल्याचा दावा करतात त्यामुळे थरकाप उडालाय.

ड्रॅगन हा सापासारखा प्राणी आहे..ज्याला लांब शेपूट आहे. तो उडणारा प्राणी असून त्याच्या भयंकर तोंडातून आगही काढतो. या धोकादायक प्राण्याचा उल्लेख चीनच्या लोककथांमध्येही आढळतो पण, परत ड्रॅगन आलाय का? याची आम्ही पोलखोल केली मग काय सत्य समोर आलं पाहा.