धनदेवीनं केला भाजीवाल्या एक्स-बॉयफ्रेंडचा गेम, शेवटी बोलवावा लागला JCB... थरारक घटना!

धनदेवीनं केला भाजीवाल्या एक्स-बॉयफ्रेंडचा गेम, शेवटी बोलवावा लागला... थरारक घटना!

Updated: Oct 1, 2022, 12:33 AM IST
धनदेवीनं केला भाजीवाल्या एक्स-बॉयफ्रेंडचा गेम, शेवटी बोलवावा लागला JCB... थरारक घटना!  title=

Crime News : पत्नीने आपल्या पतीला हाताशी धरत प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर प्रियकराचा मृतदेह रिकाम्या फ्लॅटमध्ये पुरला होता. (extra marital affairs) पोलिसांनी या हत्येचा तब्बल 5 महिन्यांनी उलगडा केला असून आरोपी नवरा-बायकोला गुजरातमधून अटक केली. आरोपी पत्नीचं धनदेवी बनी असं नाव आहे, तर मृताचं नाव बनी मौर्य असं असून त्याचा भाजीचा व्यवसाय होता. (extra marital affairs gurugram crime woman attackes boyfriend along with her husband)

नक्की काय आहे प्रकरण?
बनी मौर्यचं उत्तराखंडमधील हल्दवानी इथं भाजीचं दुकान होतं. साडेपाच महिन्यापुर्वी तो गायब असल्याची तक्रार त्याच्या  लहान भावाने दिली होती. मात्र पोलिसात वेगळंच सत्य समोर आलं आहे. मौर्यची त्याच्या प्रेयसीने नवऱ्याला हाताशी धरत हत्या केली होती. 

मौर्य आणि धनदेवीचे लग्नाआधी प्रेमसंबंध होते,  होळीच्यावेळी ती हल्दवानी इथं आली होती त्यावेळी तिने तिचा नंबर मौर्यला दिला. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढली. एक दिवस धनदेवीने त्याला तिच्या घरी बोलावलं. मौर्यपण घरी गेला मात्र  कोणत्या कारणावरून दोघांमघ्ये कोणत्यातरी कारणावरून वाद होतो. 

धनदेवी आणि तिचा पती हरिश पाल दोघे मिळून मौर्यची हत्या करतात. त्यानंतर मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून रिकाम्या खोलीत नेऊन पुरतात. दुसरीकडे मौर्यच्या लहान भावाने पोलिसात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतो. लहान भावाला धनदेवी आणि भावाच्या अफेरबद्दल माहिती असते. याबद्दल तो पोलिसांनाही याची माहिती देतो. 

जवळपास दीड महिन्यानंतर पोलीस धनदेवीच्या कॉलनीमध्ये पोहचतात. त्यावेळी पोलिसांना पाहून मागील दाराने पळून जातात. मात्र ते फार काळ पोलिसांना चकवा देऊ शकले नाहीत. उत्तराखंड पोलिसांनी दोघांना गुजरातमध्ये अटक केली. त्यानंतर तपास केल्यावर गुन्ह्याची कबुली देतात. जिथं मौर्यचा मृतदेह पुरलेला असतो ती जागाही ते दाखवतात, पोलीस रात्री जेसीबी बोलावून ती जागा उकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवतात. पोलिसांनी दोघा नवरा बायकोला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.