Extra Marital Affair : अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने 'असा' काढला काटा

पत्नीने प्रियकरासह मिळून अशी केली पतीची हत्या, घटना वाचून तुम्हाला बसेल हादरा 

Updated: Sep 16, 2022, 11:19 PM IST
Extra Marital Affair : अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने 'असा' काढला काटा  title=

मडियाव : देशभरात अनैंतिक संबंधाच्या घटना वाढतच चालल्या आहेत. याच अनैतिक संबंधामुळे गुन्ह्याच्या घटनांमध्ये ही खुप मोठी वाढ झाली आहे. अशीच एक अनैतिक संबंधाची घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने प्रियकरासह मिळून पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे. ही घटना एकूण सासरच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. नेमकी ही घटना कशी घडलीय ते जाणून घेऊय़ात.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी पोलीस चौकीपासून काही अंतरावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता म़ृत व्यक्तीचं नाव अखिलेश वर्मा असल्याचे समोर आले होते. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. 

पोलिसांनी या प्रकरणात मृत अखिलेशची पत्नी नेहा हिची चौकशी केली. या चौकशी दरम्यान पत्नी नेहा हिच्या वक्तव्यात विरोधाभास आढळला होता. त्यामुळे पोलिसांना पत्नीवर संशय बळावला होता. पोलिसांनी पत्नीची कसून तपास करायला सुरुवात केली होती. या तपासात नेहाने प्रियकर राहुल गिरी आणि त्याचा मित्र कौशल यांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी राहुल गिरीला ताब्यात घेतले.  

पोलिसांच्या चौकशीत राहुलने सांगितले की, नेहाच्या सांगण्यावरून पती अखिलेशचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर दुसरा मित्र कौशलच्या सहाय्याने तो मृतदेह म़़डियाव घैलाजवळ फेकून फरार झाले असल्याची कबूली दिली होती. 

पुढे पोलिसांनी माहीती दिली की, अखिलेश वर्मा यांची पत्नी नेहा हिचे राहुल गिरी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून अखिलेश वर्माची हत्या करण्याचा निर्णय घेतला.  आणि या योजनेनुसार त्यांनी मिळून अखिलेश वर्माची हत्या केली.

दरम्यान पोलिसांनी अखिलेश वर्मा नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर राहुल गिरी यांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या मडियावमध्ये ही घटना घडलीय. या घटनेने राज्य हादरलं आहे.