Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अडकलेल्या कामगारांना तब्बल 17 दिवसानंतर बाहेर काढता येणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा प्रकल्पाअंतर्गत या बोगद्याचं काम सुरू होतं. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले. नऊ दिवसानंतर अन्नपाणी मिळालेल्या मजुरांना भारतीय लष्कराची मदतीने आता बाहेर काढण्यात येत आहे. मात्र, या सर्व घटनेत भारताला एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या अर्थाने तो परदेशी व्यक्ती देवदूत ठरला आहे. त्याचं नाव अरनॉल्ड डिक्स... अरनॉल्ड डिक्स (Arnold Dix) आहे तरी कोण? चला तर मग पाहुया...
बचाव कार्यात जगभरातील अनेक तज्ज्ञ सहभागी झाले होते. तर ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस तज्ज्ञ (International tunnelling expert) अर्नोल्ड डिक्स यांना बोलावण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियामधून त्यांना खास बोलवण्यात आलं अन् आल्यावर त्यांनी मजुरांना वाचवण्याचा मास्टरप्लॅन सांगितला. 20 नोव्हेंबरला डिक्स बोगद्याच्या ठिकाणी पोहोचले. गेल्या 17 दिवसात प्रत्येकाने नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला दिलाय. डिक्स बोगद्याच्या ठिकाणी रात्रंदिवस कामगारांच्या संपर्कात राहिले होते. त्यामुळे काम जोमाने करण्यावर त्यांनी भर दिला.
अर्नोल्ड डिक्स भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ञ आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेकांना बाहेर काढण्यात मदत केली आहे. डिक्स ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेस्टिगेटर्समध्ये बॅरिस्टर देखील आहेत. अभियांत्रिकी, भूविज्ञान, कायदा आणि जोखीम व्यवस्थापन प्रकरणांमध्ये तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. जोखमींबद्दल सल्ला देणं आणि यशस्वीरित्या बाहेर काढणं हे काम त्यांनी आधीही करून दाखवलंय. 2022 मध्ये त्यांना अमेरिकेच्या नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनने समिती सेवा पुरस्काराने सन्मानित केलं होतं. अरनॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (Geneva) चे अध्यक्ष आहेत.
मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असताना बोगद्याबाहेर भगवान बौख नाग देवतेची पुजा केली गेली. त्यावेळी अरनॉल्ड डिक्स बोगद्याजवळ पोहचले आणि भगवान बौख नाग देवतेच्या पुजेत सहभागी झाले. अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांचं मनोबल वाढवणं ही सर्वात मोठी गरज असते. नाहीतर मानसिकरित्या मोठा परिणाम होऊ शकतो, असं अर्नोल्ड डिक्स (Arnold Dix) यांनी म्हटलं आहे.
- Wasnt his country
- Weren't his people
- Wasnt his jobBut Australian Arnold Dix, President of the Internation tunneling association rushed to India, worked 24/7 to spearhead the rescue operation in challenging conditions at this age.
He treated those stuck workers like they… pic.twitter.com/pORO5opgD0
— Roshan Rai (@RoshanKrRaii) November 28, 2023
संवादाची कला ही मूलत: कथाकथनाची कला आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे मूळ कथाकथनात आहे. परंतु आपल्याला ती कौशल्ये पुनरुज्जीवित आणि परिष्कृत करण्याची आवश्यकता आहे. येथे एक ऑस्ट्रेलियन आम्हाला मास्टर क्लास देत आहेत, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
The art of communication is essentially the art of storytelling. Our ancient culture has its roots in storytelling. But we need to revive & refine those skills. In the meantime, here’s an Australian giving us a master class… pic.twitter.com/QP4huuS78u
— anand mahindra (@anandmahindra) November 28, 2023