Corona Vaccine : दुष्परिणाम होऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यास विमा कंपन्या उचलणार खर्च

देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यात काहींना लसीचा दुष्परिणामही जाणवतोय, ज्यामुळे त्यांना काही वेळासाठी किंवा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतंय. मात्र याचा खर्च विमा कंपन्या उचलणार की नाही, हा प्रश्न कायम होता. 

Updated: Mar 19, 2021, 02:04 PM IST
Corona Vaccine : दुष्परिणाम होऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यास विमा कंपन्या उचलणार खर्च title=

मुंबई : देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यात काहींना लसीचा दुष्परिणामही जाणवतोय, ज्यामुळे त्यांना काही वेळासाठी किंवा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतंय. मात्र याचा खर्च विमा कंपन्या उचलणार की नाही, हा प्रश्न कायम होता. 

त्यानुसार आता भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)ने स्पष्ट केलं आहे, की विमा कंपन्यांना हा खर्च उचलावा लागेल

IRDAI च्या आदेशात नेमकं काय म्हटले आहे?

पॉलिसीधारकाने कोरोनाची लस घेतली असेल, आणि त्यांना त्यासंदर्भात कोणते त्रास होत असतील, दुष्परिणाम जाणवत असतील. अशी व्यक्ती जर रुग्णालयात दाखल झाली, तर त्या उपचारांचे पैसे भरायला विमा कंपन्या नाही म्हणू शकत नाहीत. 

विमा कंपन्यांच्या ज्या आधीपासून अटी-शर्थी आहेत, त्यानुसार हे पैसे द्यावे लागतील. 

आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेला आक्षेप

काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, की कोरोनाची लस घेतल्यानंतर जर आम्हाला रुग्णालयात अॅडमिट व्हावं लागलं, तर विमा कंपन्या त्याचे पैसे भरणार का? त्यानंतर क्लेम केला, तर विमा कंपन्यांना ह्या औषधोपचाराचे पैसे भरावे लागतील असं IRDAI ने स्पष्ट केलं आहे.